फुले शाहू आंबेडकर चळवळीचे पत्रकार दत्ता सूर्यवंशी यांचा सन्मान.
बोपोडी : सामाजिक चळवळीत गेली वीस वर्ष पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाला जागृत करण्याचे आणि भारतीय संविधान विषयी महाराष्ट्र भर जनजागृती केल्या बद्दल फुले शाहू आंबेडकर चळवळीचे खंदे समर्थक आणि दै. सम्राट चे पत्रकार दत्ताजी सूर्यवंशी यांचा सन्मान जेष्ठ विचारवंत वसंतदादा साळवे यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी टी जे कॉलेज चे उपप्राचार्य प्रा. अरुण शेलार, प्रमुख पाहुणे आमदार दीप्तीताई चवधरी, ऍड. रमेश पवळे, उद्योजक एच एम शिंदे,धम्मबंधू विक्की ढोणे, धम्म सेवक राजेंद्र शेलार, अण्णाभाऊ ट्रस्ट चे अंकुश साठे, सुरेश पवार, नितीन मरफळे, राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा विजय जाधव, ज्वेल्स ऑफ आलेगावकर माजी विद्यार्थी अध्यक्ष पोपट आल्हाट, सुहास मिरजकर, सतीश महाजन, काँग्रेस च्या कांताताई ढोणे, राष्ट्रवादी काँग्रेस वसुधाताई निरभवने,काँग्रेस पुणे सरचिटणी सुंदरताई ओव्हाळ, शिवाजीनगर अध्यक्ष राष्ट्रवादी दिलशाद अत्तार, विमल खांडेकर, मोनिका पठारे, ग्रेस गोर्डे, बोपोडी ब्लॉक राष्ट्रवादी अध्यक्ष सतीश शहा,भगवान कांबळे, मिलिंद माने, विलास मोरे,नंदू कांबळे , सलमान शेख इत्यादी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विनोद सोनवणे, सूत्रसंचालन सादिकभाई शेख आभार राष्ट्रवादी काँग्रेस शशिभाऊ पांडुळे यांनी मानले.