पुणे जिल्हास्तरीय थाई बॉक्सिंग स्पर्धा संपन्न,
पुणे जिल्हास्तरीय थाई बॉक्सिंग संघटना व भीमसेवा शिवसेवा प्रतिष्ठानाच्या वतीने थाई बॉक्सिंग चॅम्पियनशिप 2024 या स्पर्धेचे आयोजन पुणे कॅम्प येथील डॉ, बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन मध्ये संपन्न झाले, या बॉक्सिंग स्पर्धेमध्ये दहा ते वीस वयोगटातील मुला मुलींनी सहभाग घेतला या स्पर्धेचे उद्घाटन पुणे थाई बॉक्सिंग असोसिएशन चे अध्यक्ष जमील अहमद गुलाब खान यांच्या हस्ते झाले, या बॉक्सिंग स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक चॅम्पियनशिप ट्रॉफी विलू पूनावाला इंग्रजी माध्यम शाळा यांनी पटकावला द्वितीय चॅम्पियनशिप ट्रॉफी लेडी झु बैदा इंग्लिश मीडियम स्कूल यांनी पटकावला तृतीय चॅम्पियनशिप ट्रॉफी टीम्स इंग्लिश स्कूल यांनी पटकावला या स्पर्धेमध्ये सुमारे 150 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता,
या बॉक्सिंग स्पर्धेचे आयोजन भीमसेवा शिवसेवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष ज्ञानेश्वर कांबळे यांनी केले,
यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) पुणे शहर अध्यक्ष संजय सोनवणे, शशिधर पुरम, आतिश कुऱ्हाडे, स्वाती पत्की, रूमना जमिल शेख, नीलम अहिर, यास्मिन पटाई, उस्मान अख्तर, मोहन यादव, अबिल यादव, राजेशपुरम, अभिषेक गांगुर्डे, संजय सकट, विकास भांभुरे, महेंद्र भोज, विजयराव भोसले, महेंद्र गायकवाड, राजाभाऊ अंकुश, काशिनाथ नंदी, सुदर्शन कांबळे, आदि यावेळी उपस्थित होते