नगरसेवक, आमदार, महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री, खासदार, आणि प्रवक्ते अशा अनेक पदांवर आपला ठसा उमटून जनतेशी सेवा करत आपली आठवण अस्मरणीय ठेवत बहुजनांचा नेता, दिवंगत वसंतराव चव्हाण यांच्या अठराव्या स्मृतिदिनानिमित्त पुणे कॅम्प येथील वसंतराव चव्हाण भवनामध्ये अभिवादनाचा कार्यक्रम घेण्यात आले होते, खा, वसंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेस विविध मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले होते,
यावेळी विविध मान्यवरांनी त्यांच्या राजकीय, सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक, क्षेत्रामध्ये केलेल्या अनमोल आठवणींना उजाळा देत वसंतराव चव्हाण यांच्या जीवनावर आत्मचरित्र पुस्तकाचे लवकरच प्रकाशन व्हावे अशी भावना व्यक्त केले,
यावेळी कार्यक्रमाचे आयोजन लष्कर बेडा पंचायत व विद्यार्थी सेवा संघ यांनी केले,
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे पुणे शहर उपाध्यक्ष कनव वसंतराव चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे रवींद्र अण्णा माळवदकर, दलित पॅंथर ऑफ इंडियाचे अध्यक्ष बापूसाहेब भोसले, सचिन अण्णा तावरे, नरोत्तम चव्हाण, चंद्रकांत चव्हाण, कविराज संघेलिया, विनोद नीनारिया, नरेश जाधव, कुणाल करोते, आशिष जानजैत, सिद्धांत नारायण सारवान, शैलेंद्र जाधव, संजय मेमजादे आदि यावेळी उपस्थित होते