मातंग साहित्य परिषद पुणेतर्फे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, समाजसुधारक गोपाळ गणेश आगरकर, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त ‌‘टिळक, आगरकर, अण्णा भाऊ साठे यांच्या संवादी भूमिकांची बेरीज‌’ या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला.

मातंग साहित्य परिषद पुणेतर्फे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, समाजसुधारक गोपाळ गणेश आगरकर, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त ‌‘टिळक, आगरकर, अण्णा भाऊ साठे यांच्या संवादी भूमिकांची बेरीज‌’ या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला होता.
त्यावेळी मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले. राष्ट्रीय भटक्या विमुक्त जाती आयोगाचे माजी अध्यक्ष पद्मश्री दादा इदाते, ज्येष्ठ पत्रकार सम्राट फडणीस, रानडे इन्स्टिट्यूटचे प्रमुख डॉ. संजय तांबट यांचा सहभाग होता. अध्यक्षस्थानी विवेकवादी विचारवंत डॉ. श्रीपाल सबनीस होते. मातंग साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. धनंजय भिसे व्यासपीठावर होते.
प्रास्ताविकात डॉ. धनंजय भिसे यांनी अभिजन-बहुजन हा भेद मिटवून समाजाला पुढे नेण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन केले असल्याचे . सूत्रसंचालन प्रा. मोहन शिंदे यांनी केले.तर दादाभाऊ आल्हाट यांनी मांडले.
यावेळी कार्यक्रमाला आद्य क्रांतिगुरू वीर लहुजी वस्ताद साळवे यांचे वंशज पै.केतन अशोक साळवे,निलेश गद्रे,डॉ.संदिप सांगळे,डॉ.संतोष रोडे,प्रा.रत्नदीप कांबळे,अशोक लोखंडे,मारुती वाडेकर,अथर्व इदाते, नंदा साळवे,सचिन साठ्ये,सुहास देशपांडे,श्रीनिवास राहळकर,भास्कर केळकर,अनिल भस्मे,डॉ.विनायक पवार,विनोद सुर्यवंशी, विनोद अष्ठूळ ,डॉ.जयवंत अवघडे,राजश रासगे भास्कर नेटके,प्रसाद खंडागळे,संपत जाधव,विजय भिसे,उज्ज्वला हातागळे,मारुती पवार इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
➖➖➖➖➖➖➖

× How can I help you?