इंडियाज बेस्ट डान्सर 4 मध्ये ‘मेगा ऑडिशन्स’साठी करिश्मा कपूरने परिधान केला एक सुंदर फ्लोरोसंट हिरव्या रंगाचा ड्रेस; त्याच्याशी संबंधित एक आठवणही सांगितली

या वीकएंडला सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील इंडियाज बेस्ट डान्सर – सीझन 4 च्या मेगा ऑडिशनमध्ये जबरदस्त डान्स दंगलीसाठी तयार व्हा. या भागात देशभरातून निवडण्यात आलेले होतकरू स्पर्धक आपली असामान्य प्रतिभा आणि दमदार मूव्ह्ज सादर करून ‘बेस्ट बारह’मध्ये आपले स्थान पक्के करण्यासाठी दंगलीत उतरतील. आपले ENT स्पेशलिस्ट करिश्मा कपूर, गीता कपूर आणि टेरेन्स लुईस देखील पूर्ण तयारीनिशी कलाकारांची पारख करण्यास सज्ज आहेत. ते सर्वोत्तम बारा स्पर्धक काळजीपूर्वक निवडतील, जे पुढे जाता हा सीझन रोमांचक बनवतील!

मेगा ऑडिशनमध्ये स्पर्धा अटीतटीची आहे. या भागासाठी बॉलीवूड सुंदरी करिश्मा कपूर एक सुंदर फ्लोरोसंट हिरव्या रंगाचा ड्रेस परिधान करून आली होती. तिला पाहून न राहवून टेरेन्स लुईसने तिचे कौतुक करत म्हटले, “करिश्मा, तू या ड्रेसमध्ये फारच ग्लॅमरस दिसत आहेस!” त्यावर खुश होत करिश्मा म्हणाली की, “मेगा ऑडिशनला न्याय द्यायचा, तर छान तयार व्हायलाच हवे ना!” त्यानंतर तिने एका लयदार गीताच्या शूटिंगच्या वेळेसची आठवण सांगितली आणि ते गाणे आणि तिचा सह-अभिनेता कोण असेल हे टेरेन्सला ओळखायला सांगितले.

करिश्मा कपूर म्हणाली, “टेरेन्स, बऱ्याच वर्षांपूर्वी मी एक गाणे शूट केले होते, ज्यात मी ह्याच रंगाचा पोशाख परिधान केला होता. तू सांगू शकशील का ते कोणते गाणे होते? आणि त्या गाण्यात माझ्यासोबत कोण होते?”

टेरेन्सने क्षणार्धात उत्तर दिले, “मला आठवतंय, तुझ्या करियरमध्ये एक टप्पा होता, ज्यावेळी तुझा लुक विशिष्ट पद्धतीचा, ग्लॅमरस असायचा. तू ज्या चित्रपटाबद्दल सांगत आहेस, त्यात सुनील शेट्टी होता. मला आठवतंय, तू एक तोकडा फ्लोरोसंट हिरव्या रंगाचा ड्रेस परिधान केला होतास, तुझे केस स्ट्रेट होते, ती त्यावेळेसची फॅशन होती. हे गाणं होतं, ‘रक्षक’ चित्रपटातील ‘सुंदरा सुंदरा’!”

करिश्मा कपूर पुढे म्हणाली, “त्यावेळी पावसाळा होता आणि आम्ही मढ आयलंडवर शूटिंग करत होतो. त्यावेळी आम्ही चार ते पाच किंवा कधीकधी त्यापेक्षा जास्त शिफ्ट्समध्ये काम करायचो. ते गाणे शूट करण्यासाठी यांच्याकडे फक्त अडीच ते तीन तास होते. मी हा ड्रेस परिधान केला, आम्ही समुद्रकिनारी होतो आणि त्यावेळी पाऊस पडत होता. असे असूनही आम्ही तीन तासांत ते गाणे पूर्ण केले!”

या वीकएंडला बघायला विसरू नका, इंडियाज बेस्ट डान्सर – सीझन 4 मध्ये मेगा ऑडिशन्स रात्री 8:00 वाजता फक्त सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर!

× How can I help you?