मुस्लिम आणि ख्रिश्चनांना आरक्षण मिळण्याकरिता इंक्रेडिबल समाजसेवा संघटनेच्या वतीने कोंढवा पुणे येथे बेमुदत आंदोलन,

मुस्लिम आणि ख्रिश्चन यांना आरक्षण मिळण्याकरिता इंक्रेडिबल समाजसेवा संघटनेच्या वतीने कोंढवा येथे विविध मागण्यांकरिता बेमुदत आंदोलन करण्यात आले,
या आंदोलनामध्ये प्रमुख मागण्या मुस्लिम आणि ख्रिश्चन समाजास राजकीय प्रतिनिधित्व राखीव मतदार संघात मिळावे, शैक्षणिक आणि सरकारी नोकरीमध्ये आरक्षण मिळावे, बार्टी प्रमाणे मा र्टीची स्थापना करण्यात यावी, सामाजिक सुरक्षा हेट स्पीच माॅब लीचिंग व इतर यास सुरक्षा कवच करिता ॲट्रॉसिटी प्रमाणे कायदा करण्यात यावा, अल्पसंख्यांक हक्क दिवस (18 डिसेंबर) शासनाकडून राबवून 15 कलमी कार्यक्रम राबविण्यात यावा, जातीनिहाय जनगणना. शैक्षणिक. आर्थिक. सामाजिक. राजकीय नुसार करण्यात यावी, अशा विविध मागण्या केंद्र सरकारकडे. इंक्रेडीबल समाजसेवा संघटने चे संस्थापक अध्यक्ष असलम बागवान यांच्या वतीने करण्यात आली आहे,

यावेळी आंदोलनाला जाहीर पाठिंबा देण्यासाठी आमदार चेतन तुपे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पुणे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप, मा जी नगरसेवक रहीस सुंडके, साईनाथ बाबर, परविन शेख, यांच्यासहित हयूमेनेटि फाउंडेशन कमेल रजा व इतर सामाजिक संस्थांनी यात सामील होऊन पाठिंबा दर्शविला,
यावेळी राजू सय्यद, इब्राहिम शेख, अमजद पठाण विना कदम, नाझिया शेख, सादिक पानसरे, फरदीन शेख, मोहीम खान, अब्दुल बागवान, हजमत पठाण, युसून मंडप, शमीम पठाण, रुबीना काझमी, आदि यावेळी उपस्थित होते.

× How can I help you?