चर्मकार समाजाचा स्नेह मेळावा पुण्यामध्ये संत रोहिदास यांचे स्मारकासाठी पाठपुरावा करणार उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत दादा पाटील,

भारतीय जनता पार्टी कोथरूड विभागाच्या वतीने चर्मकार समाजाच्या स्नेह मिळावा आणि गटई कर्मचाऱ्यांना पावसाळी छत्रांचे वाटप महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण व वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी चंद्रकांत दादा पाटील म्हणाले पुण्यामध्ये संत रोहिदास महाराज यांच्या स्मारकासाठी पाठपुरावा करणार असे यावेळी सांगितले,


यावेळी चर्मकार महासंघाचे महाराष्ट्र प्रदेश युवक अध्यक्ष रवींद्र खैरे यांनी मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्याकडे चर्मकार समाजाचे प्रश्न व विविध मागण्या केल्या यामध्ये संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाकडे येणारा निधी वाटला जात नाही तो परत जातो, पुणे शहरात संत रोहिदास यांचे स्मारक उभे करावे, महाराष्ट्रातील चर्मकार समाजातील कार्यकर्त्यांना महापालिका. विधानसभा. लोकसभेसाठी प्रतिनिधित्व मिळावे आदींची मागणी करण्यात आली,


यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध उद्योजक महेश तावरे, निवृत्त सनदी अधिकारी वसंत सोनवणे, भाजपा प्रदेश सचिव वर्षा हडाळे, कोथरूड दक्षिण मंडळ अध्यक्ष डॉ, संदीप बुटाला, सरचिटणीस प्रा, डॉ, अनुराधा एडके, गिरीश खत्री, दीपक पवार, नवनाथ जाधव, माजी नगरसेविका ॲड, मिताली सावळेकर, कार्यक्रमाचे संयोजक निलेश सोनवणे, अमर वाघमारे, अशितोष वैशंपायन, यांच्यासह मोठ्या प्रमाणात चर्मकार बांधव उपस्थित होते

Recent Post

× How can I help you?