पुणे कॅम्प येथील जॉन विल्सन एज्युकेशन सोसायटीचे सेंट जॉन्स सेकंडरी स्कूलच्या विद्यार्थ्यांना मोहिते अँड असोसिएट्स पुण्याचे सुरेंद्र मोहिते यांच्या हस्ते क्रिकेट खेळाचे संच भेट देण्यात आले होते तसेच सनी
स्पोर्ट्स चे जयंत भोसले यांच्याकडून फुटबॉल व इतर क्रीडा साहित्यचे वितरण करण्यात आले होते, तसेच शाळेतील गरीब गरजू विद्यार्थ्यांचे गणवेशासाठी स्वरेषु कला मंच पुण्याचे प्रमुख निवृत्ती नायब तहसीलदार सुनील शिरसाट यांच्याकडून शाळेला धनादेश देण्यात आले होते, याप्रसंगी प्रमुख पाहुणे अब्राहम विल्यम्स, शिव कामगार सेनेचे शिक्षक शिक्षकेतरसंघ पुणे जिल्हाप्रमुख अनिल गडकरी (सर), शाळेच्या मुख्याध्यापिका मारिया देठे, जमीर शेख, जावेद सय्यद, जिल्हाधिकारी कार्यालयाचे नोंदणी प्रमुख अजित साळी, आदि यावेळी उपस्थित होते