पुणे : प्रतिनिधी
नवी सांगवी येथील प्रसिद्ध दंतचिकित्सक आणि विश्वविक्रम धारक डॉ. आदित्य पतकराव यांनी फोर्ब्स मॅगझीनमध्ये स्थान मिळवून एक महत्वपूर्ण उपलब्धी साधली आहे.
दंत चिकित्सक म्हणून केलेली रुग्णसेवा तसेच सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल डॉ. आदित्य पतकराव यांना हा बहुमान मिळाला आहे.
गेल्या ११ वर्षांपासून डॉ. पतकराव आंतरराष्ट्रीय स्तरावर अत्याधुनिक दंत रुग्णालयाच्या माध्यमातून दंतचिकित्सा क्षेत्रात अग्रणी राहिले आहेत. अंबेजोगाई (बीड) येथून आलेल्या डॉ. आदित्य यांची यात्रा प्रेरणादायक आहे.
त्यांनी महत्वपूर्ण आव्हाने पार करत आंतरराष्ट्रीय ख्याति प्राप्त केली आहे आणि एक प्रमुख दंतचिकित्सक म्हणून उदयास आले आहेत.
फोर्ब्स मॅगझीनमध्ये समाविष्ट झाल्यावर डॉ. आदित्य यांनी आपली कृतज्ञता व्यक्त केली
दरम्यान डॉ. आदित्य यांना यापूर्वी देखील अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.
या पुरस्कारामध्ये ब्रिटिश पार्लमेंटरी अवार्ड, डेंटल ऑस्कर अवार्ड, सोक्रेट्स अवार्ड आणि इतर विविध राष्ट्रीय सन्मानांचा समावेश आहे.
उल्लेखनीय बाब म्हणजे त्यांच्या योगदानाची प्रशंसा भारताचे १४: वे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी देखील केली आहे.
या पुरस्कारांव्यतिरिक्त, महाराष्ट्र राज्य आणि यूपीएससी स्पर्धा परीक्षेच्या पुस्तकात देखील डॉ. आदित्य पतकराव यांच्या उपलब्धींची नोंद केली गेली आहे.
स्थानिक समुदाय आणि सहकाऱ्यांनी डॉ. आदित्य यांच्या उपलब्ध्यांवर अत्यंत अभिमान व्यक्त केला आहे आणि त्यांच्या भविष्याच्या निरंतर यशासाठी आणि दंतचिकित्सा क्षेत्रातील त्यांच्या योगदानासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
कोट
फोर्ब्स मध्ये समाविष्ट होणे हा माझ्यासाठी मोठा सन्मान आहे आणि मला यापुढील काळातही उत्कृष्टतेच्या दिशेने निरंतर प्रयत्न करण्यासाठी प्रेरणा मिळेल. मी माझ्या सर्व रुग्णांचे, माझ्या परिवाराचे आणि माझ्या मित्रांचे त्यांच्या समर्थनासाठी मनःपूर्वक आभार मानतो.