साहित्य, सांस्कृतिक, सामाजिक व शैक्षणिक अशा विविध विषयांवर लेखन करणारे प्रतिभावान लेखक महाराष्ट्रात साठ हून अधिक ठिकाणी कविसंमेलन मध्ये कविता सादरीकरण करणारे युवा कवी , विविध विषयांवर चर्चा करणारे व परखडपणे विचार मांडणारे व्याख्याते , आपल्या शब्दांची उधळण करीत श्रोत्यांना एकाच जागी खिळवून ठेवणारे सुप्रसिद्ध निवेदक, वक्ते, कवी लेखक,समीक्षक,परिक्षक आणि मराठी साहित्याचे अभ्यासक प्रविण खोलंबे. अशी जनमानसात लोकप्रिय ओळख असणारे प्रभावी व्यक्तिमत्त्व त्यांनी सामाजिक, साहित्य ,कला , सांस्कृतिक, शैक्षणिक अशा विविध विषयांवर लेखन केले आहे. महाराष्ट्रातील वेगवेगळ्या ठिकाणांहून प्रसिद्ध होणारी दै.वर्तमानपत्रे साप्ताहिक, मासिके, दिवाळी अंकामधून व डिजिटल पोर्टलवर त्यांचे बरेच लेख व कविता प्रकाशित झालेल्या आहेत. नाशिक आकाशवाणी केंद्रावरुन कवितांचं अभिवाचन व प्रसारित करण्यात आल्या आहेत.
जळगाव आकाशवाणी केंद्रावरुन कवितांचं अभिवाचन करण्यात आलं आहे. तर,पुणेरी रेडिओ आवाज, पुणे यामध्ये ‘हा खेळ शब्दांचा ‘या शोमध्ये त्यांच्या बऱ्याच चारोळी व कविता ह्या RJ कैलास यांनी अभिवाचन केल्या आहेत.त्यांचं साहित्य व सांस्कृतिक कला,शैक्षणिक अशा विविध क्षेत्रांतील व्यक्तीमत्व प्रविण खोलंबे. यांना प्रजासत्ताक अमृत गौरव पुरस्कार समिती . नॅशनल लायब्ररी, बांद्रा यांच्या संयुक्तविध्दामाने प्रसिद्ध लेखक प्रविण खोलंबे.यांना राष्ट्रीय विज्ञान संशोधन परिषदेचे अध्यक्ष पद्मभुषण डॉ.जी.डी.यादव यांच्या हस्ते साहित्यरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. सदर कार्यक्रसाठी प्रा.नागेश हुळवळे ,जेष्ठ साहित्यिक डॉ.बाळासाहेब तोरसकर, महाराष्ट्र राज्य पर्यटन व कला सांस्कृतिक महोत्सव समितीचे उपाध्यक्ष डॉ.ख.र.माळवे,दै.प्रहारचे संपादक मा.डाॅ.सुकृत खांडेकर, जेष्ठ साहित्यिक राजेश साबळे , साहित्यिक रणजित पवार , यांच्या उपस्थितीत प्रसिद्ध लेखक प्रविण खोलंबे.यांना साहित्य रत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. नॅशनल लायब्ररी बांद्रा, मुंबई येथे रविवार दि.२५ ऑगस्ट २०२४ रोजी आयोजित करण्यात आला होता.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सुप्रसिद्ध निवेदिका योगिता पाखले यांनी केले.तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.नागेश हुळवले यांनी भारतीय संविधान उद्देशिका वाचुन कार्यक्रमाची सुरुवात केली.
प्रजासत्ताक अमृत गौरव पुरस्कार सोहळा – २०२४ विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या उपस्थितीत नॅशनल लायब्ररी बांद्रा, मुंबई येथील सभागृहात कार्यक्रम संपन्न झाला.