गणेशोत्सवानिमित्त जनसेवा प्रतिष्ठानच्या वतीने पूर्व भागात दरवर्षीप्रमाणे यावर्षी घोरपडी, कोरेगाव पार्क, आणि मुंढवा परिसरातील सुमारे 151 मंडळातील कार्यकर्त्यांचा सन्मान जनसेवा प्रतिष्ठानचे संस्थापक
अध्यक्ष रवींद्र खैरे यांच्या हस्ते चांदीची गणपती व गमछा देऊन करण्यात आले, प्रतिष्ठानचे यंदा 12 वे वर्षे असून
गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांकडून समाजकार्य व समाज जनजागृती व्हावी तसेच कार्यकर्ता गणेशोउत्सवात करत असलेल्या कार्याची दखल म्हणून त्यांचा सन्मान केला जातो,
अशी माहिती जनसेवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष रवींद्र खैरे यांनी दिली,