नाना पेठ पुणे येथील डीसीएम सोसायटी ऑफ इंडिया या शैक्षणिक संस्थेमध्ये शिक्षक दिनानिमित्त संस्थेतील शिक्षकांनी केलेल्या ज्ञानदानाच्या व उत्कृष्ट कार्याबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला शिक्षकांना गुलाब पुष्प देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.डीसीएम सोसायटी ऑफ इंडिया या शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष डी टी रजपूत सर व जनरल सेक्रेटरी विशाल भाऊ शेवाळे साहेब यांच्या हस्ते डीसीएम सोसायटी ऑफ इंडिया या शैक्षणिक
संस्थेचे जनरल सेक्रेटरी दिवंगत एम.डी शेवाळे सर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. तसेच यावेळी संस्थेतील प्राचार्य,उपप्राचार्य,मुख्याध्यापिका, मुख्याध्यापक,पर्यवेक्षक,प्राध्यापक शिक्षक शिक्षकेतर या सर्वांना शिक्षक दिनानिमित्त पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला होता,
या कार्यक्रम प्रसंगी उपप्राचार्य डॉ, नरेश पोटे,मुख्याध्यापिका शिल्पाताई भोसले, मुख्याध्यापक कल्याण बरडे,विलास गायकवाड,आदि यावेळी उपस्थित होते