शिक्षक आदर्श विद्यार्थी घडवतात शिक्षकांचे कार्य मोलाचे एक उत्तम विद्यार्थी घडवणे हे शिक्षकांचे काम आहे त्यांचे उज्वल भविष्य हीच शिक्षकांची कार्याची पोचपावती आहे त्यांचे कार्य खरोखरच कौतुकास्पद असल्याचे मत आमदार सुनील कांबळे यांनी व्यक्त केले,
याव्हे निस्सी ख्रिश्चन असोसिएशन. (महाराष्ट्र राज्य) यांच्यावतीने शिक्षक गौरव पुरस्कार कार्यक्रम संपन्न,
याव्हे निस्सी ख्रिश्चन असोसिएशन. (महाराष्ट्र राज्य) यांच्यावतीने शिक्षक गौरव पुरस्कार कार्यक्रम नाना पेठ वायएमसीए येथे संपन्न झाले यावेळी महाराष्ट्र राज्यातून सोलापूर विभागाचे श्रीमती वनिता मेकेंझी यांना आमदार सुनील कांबळे यांच्या हस्ते जीवनगौरव पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला तसेच यावेळी पुणे व उपनगरातील सुमारे 45 शिक्षकांचा आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरवण्यात आले, यावेळी 300 शिक्षकांना भेटवस्तू देण्यात आले,
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून एडवोकेट अर्जुन खुरपे, पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाचे माजी उपाध्यक्ष दिलीप गिरमकर, शिव कामगार सेना महाराष्ट्र राज्याचे प्रमुख सुधीर कुरुमकर, बाबासाहेब जगताप, रेव्ह डॉ. एम, डी, बोर्डे, बिशप प्रदीप वाघमारे, जावेद सय्यद, सामाजिक कार्यकर्ता राजन नायर आदि यावेळी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन असोसिएशनचे संस्थापक, अध्यक्ष, नितीन गोडेँ, (सचिव) अनिल गडकरी, यांनी केले.