गिव्हिंग फॉर गुड फाउंडेशन या पुण्यामधील स्वयंसेवी संस्थेने यवत स्टेशन येथील जिल्हा परिषदेच्या शाळेला तीन संगणक संच भेट दिले आहेत. यामुळे आता या शाळेतील विध्यार्थ्यांना संगणक शिक्षण देणे शक्य होणार आहे.हे संगणक संच शाळेला उपलब्ध झाल्यानंतर यवत गावाचे उपसरपंच श्री सुभाषबापू यादव यांच्या हस्ते पूजन करून संगणकाचा वापर सुरु करण्यात आला आहे.
मुलांना संगणक शिक्षण देता यावे यासाठी गिव्हिंग फॉर गुड फाउंडेशन या संस्थेने केलेल्या मदतीबाबत मुख्याध्यापिका सौ. जयश्री रायकर यांनी शाळेच्या वतीने आभार मानले.यापूर्वी देखील संस्थेने शाळेतील विध्यार्थ्यांना दप्तर वाटप केले होते.
यवत गावचे उपसरपंच श्री सुभाषबापू यादव यांनी शिक्षकांनी संगणक मिळविण्यासाठी केलेल्या प्रयत्नाबद्दल शिक्षकांचे कौतुक केले. तसेच शाळेला आवश्यक ती सर्व मदत करण्याचे आश्वासन दिले.
संगणक संच उपलब्ध करून देण्यात गिव्हिंग फॉर गुड फाउंडेशन या संस्थेच्या हेनल शहा ,साक्षी ग्रोव्हर ,प्रतिक जोशी, सतिश गवळी,तुषार भटमुळे, रामेश्वर अपार यांचे सहकार्य लाभले.
या वेळी यवत गावचे उपसरपंच श्री सुभाषबापू यादव, मुख्याध्यापिका सौ. जयश्री रायकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष्या सौ. दिपाली थोरात, शिक्षक श्री रामहरी लावंड, श्री अनिल हुंबे, सौ संगिता टिळेकर, श्रीमती संगिता वाळके, सौ. रुपाली शेळके, सौ. ढमढेरे ताई तसेच ग्रामस्थ व पालक उपस्थित होते.