महाराष्ट्रात विधानसभा निवडणूकिची तयारी जोरात असताना वडगावशेरी मतदार संघात इच्छुक उमेदवार फ्लेक्स बाजी च्या माध्यमातून मतदारांच्या नजरेत झळकताना दिसत आहेत त्यातच महत्वाच्या बऱयाच ठिकाणी होल्डिंग नसल्याने फ्लेक्स लावण्यासाठी अधिकृत मार्ग दिसत नाही म्हणून प्रत्येक महत्वाच्या चौकात, बाजारात, वरदळीच्या ठिकाणी मोठे मोठे फ्लेक्स लावताना निदर्शनास येते काही ठिकाणी तर रस्त्याच्या फुठपाथ वर येण्याजाण्यास अडथळा होत आहे अशा ठिकाणी देखील फ्लेक्स लावले जातात, एखादा उमेदवार, पक्षाचा पदाधिकारी, आजी माजी नगरसेवक, आजी माजी आमदार हे फ्लेक्स तयार करून लावन्याची जबाबदारी एखाद्या व्यवसायिकाकडे देते परंतु लावलेले फ्लेक्स तो व्यवसायिक कुठे लावतो, कसे लावतो याकडे मात्र संबंधित व्यक्ती दुर्लक्ष करतो आणि त्यातूनच एखादी घटना घडते.
या फ्लेक्स च्या जाहिरातीकडे मात्र अतिक्रमण विभाग लक्ष देते का असा प्रश्न नागरिकांना पडतो. जो उमेदवार
सामाजिक बांधिलकी जोपासणारा..,
जनतेसाठी सदैव उपलब्ध असणारा…,
जनतेच्या हृदयातील आपला हक्काचा माणूस
असा फ्लेक्स गेनबा मोझे, शाळा, त्रिदल नगर च्या समोर म. हौ. बोर्ड, येरवडा या ठिकाणी
येण्या जाण्याच्या रस्त्यात लावेल आणि नागरिकांना, मुलांना याचा त्रास सहन करावा, त्याचा परिणाम निवडणुकीवर होऊ शकतो म्हणून उमेदवार आणि इतर सर्वांनीच फ्लेक्स लावताना नागरिकांना त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी असं मत नागरिकांनी मांडले.