पठाण बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस 6 शाहरुख खान जाणून घ्या दीपिका पदुकोण चित्रपट संग्रह पठाण चित्रपट

Pathaan Worldwide Box Office Collection Day 6: बॉलिवूडचा (Bollywood) बदशाह अशी ओळख असणारा शाहरुख खान (Shah Rukh Khan) हा सध्या त्याच्या पठाण (Pathaan) या चित्रपटामुळे चर्चेत आहे. पठाण (Pathan Movie) हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर (Box Office) रेकॉर्ड ब्रेक कमाई करत आहे. चित्रपटामधील डायलॉग्सला आणि गाण्यांना प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. हा चित्रपट 25 जानेवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीस आला. पठाण चित्रपटानं सहाव्या दिवशी देखील बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींची कमाई केली आहे. 

पठाणचं बॉक्स ऑफिस कलेक्शन 

रमेश बाला यांनी ट्विटरवर ट्वीट शेअर करुन पठाण चित्रपटाच्या कलेक्शनची माहिती दिली. रमेश बाला यांच्या ट्वीटनुसार, पठाणनं सहाव्या दिवशी भारतामध्ये 25 कोटींचे कलेक्शन केलं आहे. लवकरच हा चित्रपट भारतात 300 कोटींचा टप्पा पार करेल, असा अंदाज लावला जात आहे. तर पठाण या चित्रपटानं सहा दिवसांमध्ये जगभरातील बॉक्स ऑफिसवर 600 कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. 

तगडी स्टार कास्ट

पठाण चित्रपटात शाहरुखसोबतच दीपिका पादुकोण, जॉन अब्राहम, आशुतोष राणा आणि डिंपल कपाडिया या कलाकरांनी प्रमुख भूमिका साकारली आहे. तसेच, या चित्रपटात अभिनेता सलमान खाननं देखील कॅमिओ केला आहे. या मल्टिस्टारर चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. शाहरुखनं पठाण चित्रपटात एका रॉ एजंटची भूमिका साकारली आहे.

रिपोर्टनुसार, 250 कोटींच्या बजेटमध्ये ‘पठाण’ या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. पठाण या चित्रपटानं पठाण चित्रपटाचे दिग्दर्शन सिद्धार्थ आनंदने केलं आहे. भारताव्यतिरिक्त स्पेन, यूएई, तुर्की, रशिया, सायबेरिया, इटली, फ्रान्स आणि अफगाणिस्तान या देशांमध्ये या चित्रपटाचं चित्रीकरण झाले आहे. 

शाहरुखचे आगामी चित्रपट

पठाणनंतर शाहरुख हा जवान आणि डंकी या आगामी चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. गेल्या वर्षी राजकुमार हिरानी आणि शाहरुख खान यांनी एका व्हिडीओच्या माध्यामातून डंकी या चित्रपटाची घोषणा केली होती तर शाहरुखनं जवान चित्रपटातील त्याचा लूक देखील रिलीज केला होता. त्याच्या या दोन आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. 

महत्वाच्या इतर बातम्या : 

Pathaan 2 : आता ‘पठाण 2’ चित्रपट धुमाकूळ घालणार…, ‘पठाण’च्या यशानंतर दिग्दर्शक सिद्धार्थ आनंदची घोषणा

Source link

× How can I help you?