Maharashtra News Aurangabad News प्रेमविवाहानंतर तीन महिन्यांनी मुलीने केली आत्महत्या Cirme News

Aurangabad Crime News: औरंगाबादच्या (Aurangabad) वाळूज महानगर परिसरात धक्कादायक घटना समोर आली आहे. तीन महिन्यांपूर्वी प्रेमविवाह केलेल्या एका 21 वर्षीय तरुणीने माहेरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ही घटना सोमवारी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. अंजली रोहित आव्हाड (वय 21 वर्षे रा. बजाजनगर) असे गळफास घेतलेल्या तरुणीचे नाव आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून, परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंजलीचा प्रेमविवाह 9 नोव्हेंबर 2022 रोजी रोहित कारभारी आव्हाड (वय 22 , वर्षे रा. बजाजनगर) या तरुणासोबत झाला होता. घरच्यांचा विरोध पाहता त्यांनी पळून जाऊन विवाह केला होता. त्यानंतर पुन्हा वाळूजला घरी परतले. दरम्यान, काही दिवसांत अंजलीचा पती आणि सासरकडील मंडळींत कुरबुरी सुरू झाल्या. तर सासरकडच्या मंडळींकडून त्रास दिला जात असल्याने शनिवारी या विषयी तक्रार देण्यासाठी अंजली एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात आली होती. यावेळी पोलिसांनी अंजली हिची आई गीता आणि पती रोहित यांच्या नातेवाईकांना बोलावून त्यांचे समुपदेशन केले होते. 

पोलिसांच्या समुपदेशानंतर, अंजली ही सासरी न जाता बजाजनगर येथील कनकधारा सोसायटीत राहणाऱ्या तिच्या आईकडे गेली होती. आज सकाळी नेहमीप्रमाणे अंजलीची आई कंपनीत कामासाठी गेल्या होत्या. यावेळी अंजली ही घरी एकटीच असल्याने तिच्या आईने कंपनीत गेल्यानंतर दुपारी अंजलीला अनेक वेळा फोन केला. मात्र अंजली फोन उचलत नसल्याने त्यांनी शेजाऱ्यांना या विषयी सांगितले होते. शेजारच्यांनी खिडकीतून डोकावून पहिले असता त्यांना अंजलीचा मृतदेह घरात लटकलेल्या अवस्थेत दिसून आला. त्यांनी याची माहिती तात्काळ अंजलीच्या आईला दिली. तर या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत, अंजलीला उपचारासाठी घाटी दवाखान्यात दाखल केले असता डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केले.

अर्ध्यावरती डाव मोडला…

अंजलीच्या वडिलांचे 4 वर्षांपूर्वीच अपघातात निधन झाले. त्यामुळे घरची जबाबदारी आईच्या खांद्यावर आली. त्यामुळे एका कंपनीत ठेकेदारामार्फत काम करत त्या आपलं घर चालवत होत्या. तर घरची परिस्थिती हलाखीची असल्याने दहावीनंतर अंजली बजाजनगर येथील एका खासगी कोचिंग क्लासेसमध्ये काम करून आईला हातभार लावत होती. दरम्यान, तिची ओळख रोहित आव्हाड याच्यासोबत झाली आणि ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले. त्यानंतर त्यांनी पुणे जिल्ह्यातील आळंदी येथे लग्न केले होते. मात्र लग्नाच्या अवघ्या काही दिवसांत वाद सुरू झाले आणि अंजलीने टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केली. 

news reels reels

महत्वाच्या इतर बातम्या : 

Aurangabad Crime News: बायको गेली माहेरी, त्याने व्हिडीओ कॉल केला अन् जीवन संपवलं

Source link

Recent Post

× How can I help you?