पुणे : जेवण न दिल्याच्या रागातून पतीने पत्नीचा गळा आवळून खून केला. पुण्याच्या (Pune Crime News) अप्पर इंदिरानगर (Upper Indira Nagar) परिसरात रविवारी रात्री ही घटना घडली. पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी पतीला अटक केली आहे. सविता संदीप औचिते (वय 32) असे गळा आवळून खून केलेल्या पत्नीचे नाव आहे. तर आरोपी पती परशुराम जोगण (वय 38) याला अटक केली आहे. गणेश दत्तात्रय शिंदे (वय 38) यांनी या प्रकरणी तक्रार दिली आहे…
आरोपी पती हा रिक्षा चालक आहे. भाड्याची रिक्षा चालवून तो कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो. तर मयत महिला ही त्याची दुसरी पत्नी आहे. रविवारी रात्री त्यांच्यात भांडण झाले. मृत पत्नी दारू प्यायली होती. भांडण झाल्यामुळे पत्नीने जेवण वाढले नाही. यामुळे पती संतापला. याचाच राग मनात धरून आरोपीने लाथा बुक्क्यांनी मारहाण करत तिचा खून केला. पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे.
मुंढव्यात एकाच कुटुंबातील चाैघांची आत्महत्या
पुणे मुंढवा भागातील एकाच कुटुंबातील चाैघांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. शेअर मार्केटमधून मोठी आर्थिक नुकसान झाल्याने चौघांनी आत्महत्या केली आहे. चारही जणांचे मृतदेह ससून रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. आत्महत्या करणाऱ्यांमध्ये दीपक थोटे (वय 59) इंदू दीपक थोटे (वय 45), मुलगा ऋषिकेश थोटे (वय 24) आणि मुलगी समीक्षा थोटे (वय 17) यांचा समावेश आहे. घटनेची माहिती मिळताच मुंढवा पोलिस पथकाने घटनास्थळी धाव घेतली. मूळचे अमरावती येथील असलेले थोटे कुटुंबीय दोन महिन्यांपूर्वी केशवनगर परिसरात वास्तव्यास आले होते.
शेजारी राहत असलेले डॉ. दौलत पोटे यांना हे कुटुंबीय राहत असलेल्या फ्लॅटचा दरवाजा बंदच असल्याने संशय आल्याने त्यांनी केशवनगर पोलीस ठाण्यात कळविले. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत दरवाजा जोरजोरात आदळून उघडला असता हा प्रकार उघड झाला. पोलिसांनी चौघांचे मृतदेह पुढील वैद्यकीय तपासणीकरिता ससून रुग्णालयात पाठविले. आर्थिक नुकसान झाल्याने त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असावे, असा पोलिसांचा अंदाज आहे. जेवण्यातून विष घेतल्याचा संशय पोलिसांनी वक्त केला आहे. शवविच्छेदनानंतर आत्महत्येचं कारण स्पष्ट होईल.
इतर महत्त्वाच्या बातम्या :
Kolhapur Crime : कोल्हापुरात क्रुरतेचा कळस! दोनवडेत मुलाच्या हव्यासापोटी पत्नीचा गळा आवळून खून; केर्लेत भावाने बहिणीला संपवले