आरक्षणाबद्दल शरद पवारांचं ‘ते’ व्यक्तव चर्चेत; “आरक्षणाची 50 टक्के..’

ळगाव – महाराष्ट्रातील मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर आरक्षण कोट्याची 50 टक्‍क्‍यांची मर्यादा काढून टाकून ती 15-16 टक्‍क्‍यांनी वाढवावी, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे.

आज येथे एका पत्रकार परिषदेला संबोधित करताना, त्यांनी ही मागणी केली. सध्या राज्यात मराठा आरक्षणाची मागणी पुन्हा जोरधरू लागली असून ठिकठिकाणी आंदोलनेही सुरू आहेत.

मराठा समाजाला इतर मागासवर्गीय समजून त्यांना ओबीसींचे आक्षण दिले तर ओबीसी कोट्यातील लोकांवर अन्याय होईल असाही काहींचा आक्षेप आहे त्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही असेही पवार यांनी म्हटले आहे. सध्याच्या 50 टक्‍क्‍यांच्या मर्यादेत केंद्राने संसदेत दुरुस्ती करून त्यात वाढ करण्याचा पर्याय आहे, असे पवार म्हणाले.

सध्याच्या ओबीसी कोट्यात मराठ्यांना सामावून घेण्याच्या काही नेत्यांच्या मागणीवर विचारलेल्या प्रश्‍नाला उत्तर देताना त्यांनी हे प्रतिपादन केले. ओबीसी आणि इतर समाजात भेद निर्माण होऊ नयेत असेही ते म्हणाले. सध्या महाराष्ट्रातील अनेक भागांत दुष्काळसदृश परिस्थिती आहे.

त्या विषयी विचारले असता पवार म्हणाले की, गुरांसाठी चारा, पिण्याचे पाणी, शक्‍य असेल तेथे पिके वाचवण्यासाठी पावले उचलणे, शेतकऱ्यांना आर्थिक मदत आणि सर्व प्रकारचे राज्य शुल्क निलंबित करणे या काही उपाययोजना राज्य सरकारला कराव्या लागतील.

× How can I help you?